सातारा : वडूजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा, जादा ऊस दरासाठी आंदोलनाचा निर्धार

सातारा : वडूज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळावा झाला. ज्येष्ठ नेते सूर्यकांत भुजबळ, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार, तसेच युवक प्रदेशाध्यक्ष सूर्यभान जाधव, काँग्रेसचे माण तालुका अध्यक्ष महेश कर्चे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धनंजय क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यंदा ऊस उत्पादकांना चांगला दर मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी केले.

यावेळी संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तालुकाध्यक्षपदी विजय देवकर, कार्याध्यक्षपदी अजय पाटील, संतोष तुपे, सागर गोडसे, सतीश पवार, अनिल कचरे, शंकरराव देशमुख आदींची निवड झाली. खटाव माण तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात मजबूत संघटना बांधणी करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला. महेश कर्चे यांनी पाणीप्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची भूमिका मांडली. यावेळी पेडगावचे माजी सरपंच अंकुश दबडे, प्रा. जयवंत खराडे, राजू फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here