सातारा : जिल्ह्यात सव्वालाख हेक्टर क्षेत्रावर ऊस, गाळपासाठी मुबलक ऊस असल्याची सद्यस्थिती

सातारा : कृषी व साखर आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाची उपलब्धता मुबलक असून, साखर कारखान्यांच्या दृष्टीने हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी लागवड झालेला आणि यावर्षीच्या गाळपासाठी तब्बल एक लाख १५ हजार ९२२ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असेल. यंदा उपलब्ध असणाऱ्या य मुबलक ऊस पिकामुळे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे गाळप उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार असून, हंगामाच्या नियोजनाकडे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फलटण तालुक्यात २१ हजार २३९.५ हेक्टर, सातारा तालुक्यात २० हजार ४४० हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. कोरेगाव तालुक्यात १५ हजार ८९२ हेक्टर तर खटाव तालुक्यात आठ हजार ५९३ हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. पाटण तालुक्यात सहा हजार २५२ हेक्टर, वाई तालुक्यात सहा हजार ३०८ हेक्टर आणि खंडाळा तालुक्यात चार हजार ७२७ हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात एक हजार २२६ हेक्टर आणि जावळी तालुक्यात एक हजार ६९ हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. तर जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही कऱ्हाड तालुक्याने ऊस लागवडीत अग्रस्थान कायम ठेवले आहे. तालुक्यात सर्वाधिक ३० हजार ७७५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here