सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक; सोमवारी चौघांनी घेतली माघार

सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, सोमवारी विविध गटातील आणखी चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या १२२ वरून ११८ वर आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली-दुशेरे व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक १ मधून महेश रघुनाथ खबाले व हनमंत शिवाजी पाटील (दोघेही रा. विंग), नेर्ले-तांबवे व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक ३ मधून प्रमोद मारुती पाटील (वाठार), तसेच इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून चंद्रकांत जोती कुंभार (बेलवडे बुद्रुक) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

या निवडणुकीसाठी सुरुवातीला १३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १० अर्ज दुबार असल्याने बाद करण्यात आले. त्यानंतर छाननी प्रक्रियेत सात अर्ज अवैध ठरल्याने १२२ उमेदवार शिल्लक राहिले होते. सोमवारी झालेल्या अर्ज माघारीमुळे ही संख्या आता ११८ वर पोहोचली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवार, दि. ९ जून ही अंतिम मुदत आहे. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवार स्वतः किंवा अधिकृत सूचकामार्फत अर्ज मागे घेऊ शकतात. अंतिम मुदतीस अजून आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने आगामी काळात आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे. दोन्ही पॅनेलकडून कोणकोण अंतिम उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here