बारामतीत एआय आधारित ऊस शेतीची ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केली पाहणी, एकरी 100 टन उत्पादनाची किमया

पुणे : शरद पवार यांनी बारामती येथे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित अत्याधुनिक ऊस शेती प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या प्रयोगाचे त्यांनी विशेष कौतुक केले. बारामतीतील शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रति एकर तब्बल 100 टन ऊस उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये ड्रोन, सेन्सर्स आणि एआय मॉनिटरिंगचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.

एआय तंत्रज्ञानात ड्रोनच्या सहाय्याने ऊस पिकावर सूक्ष्म पद्धतीने फवारणी केली जाते. त्यामुळे अन्नद्रव्ये थेट पानांमधून शोषली जातात आणि पिकाला आवश्यक पोषण योग्य प्रमाणात मिळते. यामुळे ऊसाची वाढ अधिक निरोगी आणि सक्षम होते. एआय तंत्रज्ञानामुळे जमिनीतील आर्द्रता आणि पोषक घटकांचे अचूक मोजमाप करता येते. पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ (डेल्टा टी) प्रणालीद्वारे निश्चित केली जाते. तसेच, खत नेमके कधी आणि किती प्रमाणात द्यायचे याची माहितीही शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.

ChiniMandi WhatsApp Channel

पारंपरिक पद्धतीत अंदाजाने खतांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतो. मात्र, एआय आधारित शेतीत ऊसाला जितक्या खताची गरज आहे तितकेच खत दिले जाते. त्यामुळे खतांची बचत होऊन उत्पादन खर्चात मोठी घट होत आहे. या आधुनिक शेती पद्धतीत एका एकरात सुमारे 4,500 ऊस रोपांची लागवड केली जाते. एआय मॉनिटरिंगमुळे सर्व रोपांना समान प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्ये मिळतात. परिणामी संपूर्ण शेतातील पिकाची वाढ एकसारखी आणि दर्जेदार होते. याचमुळे शेतकऱ्यांना एकरी 100 टन उत्पादनाचा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here