श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना ४ लाख टन ऊस गाळप करणार : चेअरमन शिवानंद पाटील

सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या आगामी सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे ऊसाची वाढ झालेली नाही. ऊस क्षेत्रही घटले आहे. त्यामुळे येणारा हंगाम सुरु करण्यासाठी ऊसाची अडचण असली तरी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्यावर असणारी निष्ठा व विश्वास यामुळे कारखाना व्यवस्थापनाने ४ लाख ऊस गळीताचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.

आगामी गळीत हंगामासाठी रोलर पूजनाचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी, दि. १५ रोजी चेअरमन पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हा. चेअरमन तानाजी खरात होते. याप्रसंगी संचालक गौडाप्पा बिराजदार व महादेव लुगडे यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संचालक मंडळावर विश्वास ठेवून अडचणीत असलेली ही संस्था आमच्या ताब्यात दिली. संचालक मंडळानेही विश्वासास पात्र राहून काम केले आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे उसास दर दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

ते म्हणाले, कारखान्याने गेली चार वर्षे स्पर्धेत राहून एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर वेळेत देण्याचे काम केले आहे. कामगारांचा पगारही प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत दिले आहेत. संचालक मंडळ गेली चार गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडू शकले याचा सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून उच्चांकी गाळप करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन शिवानंद पाटील यांनी केले. संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे कार्यकारी संचालक रमेश जायभाय, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here