सोलापूर : जिल्ह्यातील १० कारखान्यांनी थकवली २४६ कोटींची ऊस बिले, तीन कारखान्यांवर आरआरसी कारवाई

सोलापूर : राज्यात एफआरपी थकविणाऱ्या सात साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली असताना आणखी सात कारखान्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी या कारखानदारांना १५ जून रोजी सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस दिली आहे. राज्यातील ७१ कारखान्यांनी ६७७ कोटी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत. तर जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांनी सुमारे २४६ कोटी रुपयांची एफआरपी थकवली असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील नोंदीमध्ये दिसून येते. यापैकी तीन कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली आहे.

जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यापैकी १० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. गाळप हंगाम संपून चार महिने लोटले आहेत. तरीही १० कारखान्यांनी २४६ कोटी १२ लाख रुपये दिलेले नाहीत. साखर आयुक्त कार्यालयाने एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना वारंवार नोटीस देऊन सुनावणी घेतली. मात्र, शेतकऱ्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या थकबाकीदार कारखान्यांमध्ये श्री सिद्धेश्वर सोलापूर (३० कोटी ४४ लाख), श्री संत दामाजी मंगळवेढा (७०१ लाख), जय हिंद शुगर आचेगाव (७९ लाख), आवताडे शुगर मंगळवेढा (३५९ लाख) आणि कमलाभवानी ग्लोबल (विठ्ठल रिफायनरी) करमाळा (१३३९ लाख रुपये) आदी समावेश आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here