सोलापूर : आदिनाथ कारखान्याच्या लिलावावरून करमाळा तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले असून बागल, शिंदे व पाटील गटाकडून पत्रकार परिषदा व मुलाखतींतून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘मकाईसाठी आदिनाथची तिजोरी रिकामी केली’, या पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकरांच्या आरोपाला मकाई चेअरमन भांडवलकरांनी जोरदार पुराव्यासह उत्तर दिले आहे. ‘आदिनाथ कारखाना लिलावात जाण्या अगोदर मकाई कारखान्याचे ७३ लाख परत करा’, असे आव्हानच तळेकरांना मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी दिले आहे.
तळेकर यांनी मकाई कारखान्यासाठी ‘आदिनाथ’ची तिजोरी रिकामी केली असून ‘आदिनाथ’च्या खात्यातून मकाईच्या खात्यावर १ कोटी ६५ लाख रुपये ट्रान्स्फर केले असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. तळेकर वारंवार या १ कोटी ६५ लाखांच्या व्यवहारावरून बागल कुटुंबास टार्गेट करत होते. या आरोपास उत्तर देण्यासाठी अखेर ‘मकाई’चे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी पत्रकार परिषद आयोजित करून यास उत्तर दिले आहे.
श्री मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन दिनेश भांडवलकर म्हणाले, ‘आदिनाथ’ला जीएसटी व वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने व दंड होत असल्याने आदिनाथच्या संचालक मंडळाने मकाई कारखान्याकडे आर्थिक मदतीसाठी पत्रव्यवहार केला होता. यामुळे मकाईनेच २०२१ मध्ये आदिनाथला १ कोटी ९६ लाख रू. देऊन मदत केली होती. इतर अॅडव्हान्स पायी काही रक्कम दिली होती. त्यापैकी १ कोटी ६० लाख परत केले आहेत. यातील ३६ लाख व इतर अॅडव्हान्समधील रक्कम असे मिळून जवळपास ७३ लाख रुपये आदिनाथच मकाईला देणे लागतो.
आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे म्हणाले कि, एकहाती सत्ता होती. इतर वेळी जगताप गट, देवी गट, स्व. रावसाहेब पाटील, स्व. गोविंद बापू यांची देखील सत्ता होती. मग अधोगतीस फक्त बागल जबाबदार कसे? यापूर्वी नारायण पाटील व बागल गट यांची युती होती. नारायण पाटील यांनी आमदारकीसाठी आदिनाथ बंद पाडून बागलांची बदनामी करायची, असे कुटील राजकारण केल्याचा आरोप डोंगरे यांनी केला. शेवटी त्यांच्याच कारकिर्दीत आदिनाथ लिलावात गेला हे विशेष.
पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर म्हणाले कि, वापरली आहे. ५ मार्च २०२२ रोजी मकाईस १ कोटी ६० लाख ६५ रुपये दिले आहे. आदिनाथवर कर्जाचा डोंगर उभारण्यात माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचेही योगदान आहे. बारामती अॅग्रोबरोबर भाडेपट्टी करार असतानाही त्या विरोधात दिग्विजय बागल यांनी संचालक मंडळास कोर्टात का लावले? तर मकाई कारखान्यास १४० कोटी रुपये निधी मिळूनही गाळप हंगाम सुरू झाला नाही? जर साखर आयुक्तांना खर्चाचा तपशील दिला असेल तर एकदाही का जाहीर केला नाही?


















