सोलापूर : आवताडे शुगरचा गळीत हंगाम सुरू, यंदाही एकरकमी ऊसबिलाची परंपरा कायम ठेवणार

सोलापूर : नंदूर येथील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि.च्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष संजय आवताडे यांच्या हस्ते उत्साहात झाला. यावेळी दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णू आवताडे, नगरसेवक सोमनाथ आवताडे, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, दामाजीचे माजी संचालक भारत निकम, पप्पू काकेकर, विजय माने, जकराया नरुटे, शिवाजी मोहिते, राजकुमार यादव आणि नंदू जाधव उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांना एकरकमी ऊसबिल देण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवणार असल्याचे अध्यक्ष संजय आवताडे यांनी सांगितले.

अध्यक्ष संजय आवताडे म्हणाले की, चालू गळीत हंगामात सहवीज निर्मिती (को-जनरेशन) आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) हे नवीन सहप्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, जनरल मॅनेजर सुधीर पाटील, वर्क्स मॅनेजर धैर्यशील जाधव, चीफ केमिस्ट सुनील पाटील, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, एचआर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, चीफ अकाउंटंट बजरंग जाधव आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here