सोलापूर : भैरवनाथ कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन, ३ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

सोलापूर : भैरवनाथ शुगर युनिट क्रमांक तीनमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या निर्देशानुसार यंदाच्या गळीत हंगामासाठी तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कारखाना प्रशासन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. तालुक्यातील लवंगी येथे भैरवनाथ शुगरच्या १३व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे मार्गदर्शक शिवाजीराव सावंत यांनी दुष्काळी परिस्थिती असूनही उपलब्ध ऊस वेळेत गाळपासाठी आणण्यास सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमात शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले. चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुहास जाधव व त्यांच्या पत्नी अरुणा यांनी सत्यनारायण पूजन पूर्ण केले. ऊस वजन काटा पूजन, उसाने भरलेल्या वाहनांचे विधिवत पूजन पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे व नाथा काशिद यांनी केले. श्रीपती माने व त्यांच्या पत्नी चंद्रप्रभा यांनी देखील बॉयलर पूजन केले. रतनचंद बँकेचे चेअरमन राहुल शहा, किसन गवळी, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, आप्पासाहेब माने, सुधीर धुमाळ, दौलत माने, प्रतीक किल्लेदार, प्रशांत शिंदे, संतोष रंधवे, बंडू जाधव, जमीर इनामदार, सुदर्शन कसबे, नाथा काशिद, अमर सूर्यवंशी, श्याम गोगाव, संदीप तापडिया, समाधान जाधव, तानाजी चव्हाण, चंद्रकांत देवकर, गुरुनाथ टिगळे, गणपत गाढवे, राजकुमार स्वामी, तानाजी इंगळे, नागेश लिगाडे, संतोष नागणे, भारत निकम व कृष्णा निकम उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here