सोलापूर: श्रीसंत दामाजी कारखान्याचा ३४ वा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात झाला. बॉयलर अग्निप्रदीपन हभप बोधले महाराज यांच्या हस्ते तर गळीत हंगामाचा शुभारंभ उद्योजक रमेश मर्दा यांच्या हस्ते झाला. होमहवन पूजा श्रीसंत दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील व शीतल पाटील आणि सत्यनारायण पूजा संचालक दिगंबर भाकरे व प्रज्ञा भाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. चेअरमन शिवानंद पाटील यांनी दुष्काळामुळे तालुक्यात केवळ सहा लाख मेट्रिक टन उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. काहीतरी मार्ग काढून ऊसबिलांची थकबाकी अदा केली जाईल असे आश्वासन दिले. कारखान्याच्या कामगारांच्या वेतनासह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे रक्कम दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
चेअरमन पाटील यांनी यावेळी कारखान्याच्या कामगारांना दिवाळीसाठी दहा दिवसांच्या वेतनाएवढा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. प्रमुख पाहुणे हभप जयवंत बोधले महाराज म्हणाले की, मंगळवेढ्यात संत दामाजीपंतांचे पवित्र मंदिर आहे, त्याप्रमाणे श्रीसंत दामाजी साखर कारखानाही सभासदांचे मंदिर आहे. या संस्थेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी संचालक मंडळाने चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. यावेळी धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार, राहुल शहा, रामचंद्र वाकडे, व्हाइस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले. एमडी रमेश जायभाय यांनी स्वागत केले. रेवणसिद्ध लिगाडे यांनी आभार मानले.


















