सोलापूर : चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांची रात्र रस्त्यावरच थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील साखर कारखान्यांकडे १३० कोटी रुपयांचे ऊस बिल थकल्याने धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार (दि. २५) पासून आंदोलन सुरु केले. गुरुवारी (दि. २८) आंदोलनचा चौथ्या दिवस असून, या चार दिवसात प्रादेशिक साखर आयुक्त कार्यालयांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे. गेल्या चार दिवसांत ऊस बिलावर तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी रात्र रस्त्यावरच काढली आहे.

गुरुवारी सकाळी दहा वाजता दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गोकुळ कारखान्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांनी आधी खात्यात बिले जमा करावे. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तहसीलदार जमदाडे आणि आंदोलक शेतकरी यांच्यांत एकमत न झाल्याने तहसीलदार जमदाडे हे परत गेले. त्यानंतर आंदोलनस्थळी धाराशिव जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी भेटी देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांचे बिले मिळावीत, यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

गेल्या चार दिवसांपासून धाराशिव व सोलापूर तालुक्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच थकीत ऊसबिलासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, गजानन चक्कीकोरे, रेणुका बिराजदार, राघवेंद्र बिराजदार, देवेंद्र सैनसाखळे, मृत्यूज काझी, प्रशांत कांबळे, उत्तमकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here