सोलापूर : दि सासवड माळी शुगरचे मिल रोलर पूजन उत्साहात, शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा निर्धार

सोलापूर : येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलर पूजन दि. २४ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कारखान्याचे चेअरमन मोहन लांडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने नियोजनबद्ध तयारी सुरू केली असून, हंगाम वेळेत सुरू करून ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक गणेश इनामके, पूर्णवेळ संचालक निखिल कुदळे, व्हाईस चेअरमन विशाल जाधव, संचालक राजेंद्र गिरमे, परेश राऊत, सतीश गिरमे, राहुल गिरमे, निळकंठ भोंगळे, इंडिपेंडंट डायरेक्टर किशोरी चवरे, शुगरकेन सोसायटीचे व्हाईस चेअरमन मनीष रासकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्यातील विविध विभागांमध्ये हंगामपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगात सुरू आहेत. आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारीला गती दिली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here