सोलापूर : आदिनाथ कारखाना चालवायला देण्यास विरोध, सभासदांचे आजपासून कारखान्यासमोर उपोषण

सोलापूर : आदिनाथ साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यात येणार म्हणून सभासदांनी संचालक मंडळाच्या ताब्यात दिला. त्याच संचालक मंडळाने हा कारखाना भाड्याने देणे म्हणजे सभासदांचा विश्वासघात आहे. ३३ हजार सभासद असलेला हा सहकारी कारखाना आहे. सहकार मंत्र्यांनी सभासदांचा विचार करून हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहणे गरजेचे आहे. कारखाना हा सभासदांच्या मालकीचा राहावा म्हणून आम्ही हजारो सभासदांसमवेत मंगळवारपासून, (दि. ७ जुलै) आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची माहिती उदयसिंह देशमुख यांनी दिली.

मंगळवारी सकाळी ११ वाजता या उपोषणाला सुरुवात होणार आहे. सत्ताधारी संचालक मंडळाला जर कारखाना चालवता येत नसेल तर महाराष्ट्र सरकारने प्रशासक म्हणून नियुक्ती करावी व प्रशासकाने हा साखर कारखाना सुरू करावा अशी मागणी उदयसिंह देशमुख यांनी केली. ते म्हणाले की, जर सत्ताधारी मंडळाचा हा कारखाना खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा डाव असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. त्याअनुषंगाने आम्ही आता आर-पारची लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here