सोलापूर : पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या गळीत हंगामाचा ३६वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी शामराव साळुंखे व त्यांच्या पत्नी तथा संचालिका संगीता साळुंखे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. तर बॉयलर अग्निप्रदीपनाची विधिवत पूजा कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते झाली.

यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक असून सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसल्याने ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे कारखान्याला अपेक्षित ऊस उपलब्ध होण्याची शक्यता कमी असली, तरी उपलब्ध ऊसाचे पूर्ण क्षमतेने गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज असल्याचे चेअरमन तथा माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे. उपलब्ध ऊसाचे गाळप सुरळीतपणे करण्यासाठी आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे.

यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याकडून सुमारे ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. करारबद्ध तोडणी व वाहतूक यंत्रणेमार्फत कारखान्याला आवश्यक ऊसाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी तोडणी व वाहतूक यंत्रणा आतापासूनच कारखाना कार्यस्थळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, ज्येष्ठ संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, उमेशराव परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजीराव वायमाने, बाळासो यलमार, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसपटे, भेरू वाघमारे, गंगाराम विभुते, सदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किशन सरवदे, सिताराम शिंदे, राजू पाटील, दाजी भुसनर, दिलीपराव गुरव यांच्यासह कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here