सोलापूर : राजवी अॅग्रो पॉवरमध्ये गळीत हंगामाची तयारी, मिल रोलर पूजन उत्साहात

सोलापूर : आलेगाव बुद्रुक येथील राजवी अॅग्रो पॉवर प्रा. लि. मध्ये गळीत हंगाम २०२६-२७ चा शुभारंभ रविवारी रोलर पूजनाने उत्साहात झाला. कारखान्याचे व्हा. चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत, संचालक ऋतुराज सावंत, माजी सभापती सूर्यकांत आप्पा शेंडगे, वडोलीचे सरपंच तानाजी भैय्या गाडे, भजनदास खटके, जब्बार महाजन, अरविंद खरात, भारत गायकवाड आदी उपस्थित होते.

राजवी अॅग्रो पॉवरमध्ये यंदाचा गळीत हंगाम विक्रमी व शेतकऱ्यांसाठी लाभदायी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. दर्जेदार ऊस पुरवठ्याचे आवाहन करण्यात आले. चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांनी वेळेत व दर्जेदार ऊस कारखान्याकडे पाठविल्यास गाळप सुरळीत होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होईल. शेतकऱ्यांनी तोडणी व वाहतुकीचे योग्य नियोजन करून गुणवत्तापूर्ण ऊस पुरवठा करावा. कारखाना, शेतकरी व कर्मचारी यांच्या समन्वयातून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रविण बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. जनरल मॅनेजर (ॲग्रो) राजाभाऊ खटके यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here