सोलापूर : पावसाच्या दडीने ऊस पिक वाळू लागले, आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल

सोलापूर : कुरनूर धरणाच्या निर्मितीमुळे चपळगाव परिसरात मागील अनेक वर्षापासून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुरनूर धरणाची निर्मिती, एकरुख सिंचन योजनेच्या पुर्ततेने उपसा उत्तर अक्कलकोट तालुक्याच्या भागातील विशेषतः चपळगाव, बावकरवाडी, दहिटणे, बहऱ्हाणपूर, डोंबरजवळगे, बोरेगाव, दर्शनाळ, पितापूर, अरळी, नन्हेगाव, अकतनाळ, चुंगी, सुलतानपूर, किणी, किणीवाडी, सिंदखेड, मोट्याळ, कुरनूर, काझीकणबस शिवारात विहिरी व बोअरवेलमध्ये पाण्याची क्षमता वाढल्याने शेतकरी उसाकडे वळलेले आहेत. मात्र यावर्षी या साखर पट्टयावर दुष्काळाचा परिणाम झाला आहे. धरणाचे पाणी बंद झाल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने उसाचे उभे पीक वाळले आहे.

गेल्या वर्षी अक्कलकोट तालुक्यात जवळपास २८ हजार हेक्टर, तर चपळगाव व किणी मंडलात ७ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली. लागवडीवर लाखो रुपये खर्च करून हजारो शेतकऱ्यांनी उसाची लावण केली. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ होऊन पाण्याची मुबलकता वाढली होती. गेल्या काही वर्षात हा परिसर साखर कारखानदारांसाठी उसाचा पट्टाच बनला आहे. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस झाला नाही. मान्सूनही फिरकला नाही. कुरनूर धरणातून शेतीसाठी पाणी आवर्तन बंद केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे उसाचे पीक वाळत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी दरवर्षी मे व जून महिना महत्त्वाचा ठरतो. मात्र यावर्षी पाऊस न पडल्याने पिक वाळल्याचे दिसून येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here