सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रश्नी घंटानाद आंदोलनाचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने २० सप्टेंबरपूर्वी थकीत ऊसबिलांची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाला निवेदन दिले. कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे ऊसबिलाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. बिले न मिळाल्यास संघटनेकडून येत्या सोमवारपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल. बिले मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला. निवेदनावर रणदिवे यांच्यासह इकबाल मुजावर, मोहसीन पटेल, सचिन मस्के आदींच्या स्वाक्षरी आहेत.

याबाबत संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याचा गळीत हंगाम संपून तब्बल नऊ महिने उलटले आहेत. आगामी गाळप हंगाम महिनाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही मागील हंगामातील ऊस उत्पादकांची बिले अद्याप थकीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सण-उत्सवाचे दिवस आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना थकीत बिले मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले त्यांच्या खात्यावर जमा करावीत अन्यथा सोमवारपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या व घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here