सोलापूर : सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात थकीत ऊस बिलांवरून शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला आहे. ऊस कारखान्याला पाठवून अनेक महिने उलटले तरी अद्याप पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटी, तर धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे ९० कोटी रुपये थकीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे असलेल्या १२८ कोटी रुपयांच्या थकबाकीव्यतिरिक्त एकट्या गोकुळ शुगरकडे १३० कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात २५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. गोकुळ शुगरवर आरआरसी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धेश्वरकडे ३०.४४ कोटी, तर भीमा सहकारीकडे ३०.२२ कोटी आणि विठ्ठलसाई कारखान्याकडे २०.७७ कोटी रुपयांचा समावेश आहे. संत दामाजी सहकारी कारखान्याकडे ६. ९६ कोटी, संत कुर्मदास सहकारी १५.९७ कोटी रुपये, आवताडे शुगर्स (नंदूर) ३.९६ कोटी, कमलाभवानी ग्लोबल कॉर्पोरेशन (पांडे) २५.७९ कोटी, विठ्ठलसाई सहकारी (मुरूम) : २०.७७ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (केशेगाव) : ५.२४ कोटी, भैरवनाथ शुगर्स (वाशी) ७.१० कोटी, भीमाशंकर शुगर्स (पारगाव) : १२.२६ कोटी, धाराशिव शुगर्स (चोराखळी): ७.१० कोटी, लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज : ९.५१ कोटी, भाऊसाहेब बिराजदार (समुद्राळ) : ६.८२ कोटी, आयन मल्टिट्रेड (बाणगंगा सहकारी): ५.५३ कोटी, भैरवनाथ शुगर (सोनारी): २.७३ कोटी अशा रक्कमा थकीत आहेत.


















