महाराष्ट्र-कर्नाटकातील साखर कारखानदारांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर देण्यासाठी लॉबिंग : माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखानदारांनी एकत्र येत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर देण्यासाठी लॉबिंग केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. कर्नाटकातील कारखानदारांनी प्रतिटन ३,५०० रुपयांपेक्षा अधिक दर द्यायचा नाही, तर महाराष्ट्रातही जिल्हानिहाय ऊसदराची मर्यादा ठरविण्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेट्टी यांच्या आरोपानुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रतिटन ३,६०० ते ३,७०० रुपये, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ३,६०० रुपये, तर पुणे जिल्ह्यातील कारखानदारांनी ३,५०० रुपये दर देण्याची भूमिका घेतली आहे. बेळगावपासून पुण्यापर्यंतच्या कारखानदारांमध्ये अशा प्रकारची एकजूट झाल्याचा दावाही त्यांनी केला.

एका जिल्ह्यातील जास्त दराचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळावा

ChiniMandi WhatsApp Channel

शेट्टी म्हणाले, एका जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला जास्त पहिली उचल देत असतील, तर त्याचा लाभ इतर जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे. मात्र, कारखानदारांनी एकत्र येऊन दर मर्यादित ठेवण्याची भूमिका घेतली आहे. या लॉबिंगमध्ये विरोधी पक्षातील तसेच सत्ताधारी आघाडीतील कारखानदारांचाही समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर आणि जास्तीत जास्त पहिली उचल मिळवून देण्यासाठी आता सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

३ नोव्हेंबरला पुणे-बेंगळुरू महामार्गावर रास्ता रोको

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि कारखानदारांच्या कथित लॉबिंगला विरोध करण्यासाठी सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here