साखर उद्योगाचे भविष्य खूप चांगले आहे: Avantika Saraogi

नवी दिल्ली : भारत आयात इंधनावरील आपले अवलंबित्व कमी करणे आणि हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पर्यायी इंधनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून वाचटाल करण्यासाठी कटिबद्ध आहे. देशात यासाठी विविध पर्यायांवर काम सुरू आहे. आणि ऊस या कच्च्या मालापासून इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय साखर उद्योग यशस्वी प्रयत्न करीत आहे. या उद्योगाचे हे पाऊल फ्लेक्स इंधन वाहनांमध्ये वाढ करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मदत करेल. भारतीय साखर उद्योगाची पुढील पिढी राष्ट्रासाठी ऊर्जा उद्योग बनण्यासाठी खूप उत्साहित आहे आणि या हरित इंधन उद्योगाचे मजबुतीने नेतृत्व करण्यासाठी कंबर कसली जात आहे.

‘चीनीमंडी’ ने अलिकडेच बलरामपूर शुगर मिल्स लिमिटेडच्या (बीसीएमएल) प्रमोटर अवंतिका सरावगी (Avantika Saraogi) यांच्याशी चर्चा करताना भारतीय साखर उद्योगाच्या आगामी वाटचालीविषयी त्यांचे मत जाणून घेतले. या उद्योगाचे भविष्य खूप चांगले आहे. आणि मला असे वाटते की, जगासाठी आता ऊस हेच नवे इंधन आहे, अशी टिप्पणी अवंतिका सरावगी यांनी केली. त्या म्हणाल्या, की मला असे वाटते हा कायमस्वरूपी (Sustainable) पर्याय आहे. साखर उद्योगाशी जोडल्या गेलेल्या सर्वांचे भविष्य अमर्याद संधींनी भरलेले आहे.

भारतीय साखर उत्पादन आणि त्याचे आगामी भवितव्य, साखर दर निश्चितीवरील त्याचा परिणाम मांडताना त्यांनी सांगितले की, चालू हंगामात साखरेचे उत्पादन ४० मिलियन टनापर्यंत होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये ४.५ मिलियन टन साखर इथेनॉलच्या दिशेने वळेल. या हंगामात ६ ते ८ मिलियन टनापर्यंत साखर निर्यात केली जाण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत खप २७.५ ते २८ मिलियन टन असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे साखरेचा क्लोजिंग साठा ५.५ मिलियन टन राहील अशी शक्यता आहे. केंद्र सरकारच्या मजबूत धोरणांमुळे देशात साखर साठ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले जात आहे. यामुळे आम्हाला साखरेच्या देशांतर्गत किमतीमधील मजबुती पाहायला मिळेल.

याशिवाय जर आम्ही आंतरराष्ट्रीय स्थितीवर नजर टाकली तर ब्राझीलमध्ये देशांतर्गत पेट्रोलच्या किमतींमधील समायोजनामुळे साखर उत्पादनात वाढीची शक्यता आहे. थायलंडमध्ये उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे. तर चीन तसेच युरोपीयन संघातही उत्पादन कमीच राहील. त्यांनी सांगितले की, मार्च २०२३ पर्यंत मागणी उच्च राहील अशी आमची अपेक्षा आहे. त्यानंतर मात्र, ब्राझीलकडून नवे पिक बाजारात येईल. त्यातून साखरेच्या किमती घसरतील अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत मार्च २०२३ पर्यंत जागतिक स्तरावर साखरेचा दर १९ ते २० सेंट यांदरम्यान राहू शकतो.

भारताचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि ऊस तसेच साखर दर निर्धारण धोरणाच्या आगामी वाटचालीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, भारत सरकारकडून सक्रिय रुपात त्यांच्या धोरणांची घोषणा केली जात आहे. यातून कारखानदारांना इन्व्हेंट्री नियंत्रित करणे आणि शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यास मदत होईल. इथेनॉलच्या आघाडीवर २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारकडून व्याज सवलत योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच उत्पादन वाढविण्यासाठी कच्च्या मालाच्या विविध स्त्रोतांसाठी लाभदायी दरही सरकारने जाहीर केले आहेत.

यासोबतच सरकार इथेनॉलच्या नियोजित उचलीमध्ये मदतीसाठी विविध मंत्रिस्तरीय समुहांसमवेत संवाद आणि बैठकांमधून सहाय्य करीत आहे. २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी लाँच केल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये वेळेत बदल केला जावू शकेल. निर्यातीच्या आघाडीवर जेथे सिस्टीममध्ये अतिरिक्त इन्व्हेंट्रीची देखभाल ठेवण्याच्या धोरणांची घोषणा केली जात आहे. यासोबतच मासिक कोटा रिलिज पद्धतीद्वारे देशांतर्गत इन्व्हेंट्रीवरही लक्ष ठेवले जात आहे.

मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जात असल्याने साखर उद्योग मेक इन इंडियाचा ध्वजवाहक आहे आणि यामध्ये जगातील प्रमुख इथेनॉल उत्पादकांपैकी एक बनण्याची क्षमता आहे. बलरामपूर शुगर मिल २०२५ पर्यंत पेट्रोलियममध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या लक्ष्यपूर्तीसाठी भारत सरकार आणि साखर उद्योगाच्या उद्दिष्टाशी कसा जोडला जात आहे, यावर टिप्पणी करताना त्यांनी सांगिले की, बलरामपूरमध्ये आम्ही आपली इथेनॉल क्षमता ५२० केएलपीडीपासून १०५० केएलपीडीपर्यंत दुप्पट करण्यासाठी कॅपेक्सची घोषणा केली आहे. गुलेरियात आमचा एक प्लांट आधीपासूनच २०० केएलपीडीवर काम करीत आहे. त्याचा जानेवारी २०२२ मध्ये १६० केएलपीडीपासून विस्तार करण्यात आला आहे. मैजापूरमध्ये ३२० केएलपीडीची ग्रीनफिल्ड योजना जवळपास पूर्ण झाली आहे आणि नोव्हेंबर २०२२ पासून व्यावसायिक उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. आमच्या बलरामपूर युनिटमध्ये आणखी एक ३३० केएलपीडी इथेनॉल विस्ताराचा प्रोजेक्ट सुरू आहे. आणि डिसेंबर २०२२ पासून तेथून उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here