27 साखर कारखान्यांसहीत 85 कंपन्यांनी उत्तर प्रदेशात हॅन्ड सॅनिटायजर उत्पादनाला दिली गती

84

लखनऊ: कोरोनाचा फैलाव वाढतच आहे. तसेच सरकार आणि प्रशासन याचा खंबीरपणे सामना करत आहेत. कोरोनासाठी हॅन्ड सॅनिटाइजर संजीवनीच्या रूपात काम करत आहे. संपूर्ण देशभरात याला मोठी मागणी आहे. साखर कारखान्यांना अधिकाधिक सॅनिटायजर उत्पादित करण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने सॅनिटायजर च्या उत्पादनात सर्वात पुढे आहेत.

मिळालेल्या अधिकृत आकडयांनुसार उत्तर प्रदेशात हॅन्ड सॅनिटायजर चे उत्पादन 85 कंपन्या करत आहेत, यापैकी 27 साखर कारखाने, 12 डिस्टलरीज, 37 सॅनिटाइजर कंपनी आणि इतर 9 संस्थांचा सहभाग आहे.

या कंपन्या हॅन्ड सॅनिटायजर चे उत्पादन सातत्याने वाढवत आहेत. सध्या या कंपन्या मधून राज्यात प्रति दिन 2,00,000 लीटर हॅन्ड सॅनिटायजर तयार होत आहे.

कोरोनामुळे मार्केटमध्ये आतापर्यंत एकूण 25,76,300 लीटर सॅनिटाइजर चा पुरवठा करण्यात आला आहे. राज्य सरकार सॅनिटाइजर उद्योगाला अधिक गती देण्यासाठी हर एक प्रयत्न करत आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास 34,73,050 लीटर हॅन्ड सॅनिटायजर चे उत्पादन करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here