साखर उत्पादन ३१ टक्क्यांनी वाढून १४२.७० लाख टनावर: इस्मा

95

नवी दिल्ली : देशातील साखरेचे उत्पादन १५ जानेवारीअखेर गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी वाढून १४२.७० लाख टनावर पोहोचले आहे. साखर उद्योगाची शिखर संस्था असलेल्या इंडियन शुगर मिल असोसिएशनने (इस्मा) ही माहिती दिली आहे.

इंडियन शुगर मिल असोसिएशनने साखर हंगाम २०२०-२१ मध्ये उसाची उपलब्धतेमुळे गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये साखरेचे उत्पादन १३ टक्क्यांनी वाढून ३१० लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

गेल्यावर्षी २७४.२ लाख टन साखर उत्पादन झाले होते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या भारतामध्ये २०१९-२० या गळीत हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) १५ जानेवारीअखेर १०८.९४ लाख टन उत्पादन झाले होते.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार, चालू गळीत हंगामात १५ जानेवारीपर्यंत साखरेचे उत्पादन १४२.७० लाख टन झाले आहे की जे गेल्या वर्षीपेक्षा ३३.७६ लाख टन झाले आहे.

गेल्यावर्षीच्या ४४० साखर कारखान्यांच्या तुलनेत यावर्षी ४८७ साखर कारखाने कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यावर्षी १५ जानेवारीपर्यंत साखरेच्या उत्पादनात किरकोळ घट होऊन ४२.९९ लाख टन होत आहे.

गेल्यावर्षी राज्यात याच कालावधीत ४३.७८ लाख टन उत्पादन झाले होते. उसाची कमतरता दिसून आली आहे. याचदरम्यान, महाराष्ट्रातील उत्पादन गेल्यावर्षीच्या २५.५१ लाख टनाच्या तुलनेत वाढून ५१.५५ लाख टन झाले आहे. तिसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये साखर उत्पादन २९.८० लाख टन झाले आहे, जे याआधीच्या वर्षी २१.९० लाख टन होते.

इस्माने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये साखरेचे उत्पादन ४.४० लाख टन, तमीळनाडूमध्ये १.१५ लाख टनावर पोहोचले आहे. तर उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश छत्तीसगढ, राजस्थान, ओरिसा यांमध्ये १५ जानेवारीपर्यंत १२.८१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

गळीत हंगाम २०२०-२१मध्ये इथेनॉलचे उत्पादन ३०९.८१ कोटी लिटर झाले आहे. त्यामध्ये खराब धान्य आणि तांदूळापासून तयार केलेल्या ३९.३६ कोटी लिटरचा समावेश आहे. गळीत हंगाम २०१९-२०मध्ये साखर कारखान्यांना मंजूर केलेल्या कोट्यापर्यंत ऑक्टोबर – डिसेंबर २०२० पर्यंत तीन लाख टन साखरेचे निर्यात झाली आहे.

या कोट्याची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here