ऊस बिले वेळेवर अदा, कुठलीही देणी रखडलेली नाहीत : ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांची माहिती

पुणे : महाराष्ट्रात कारखानदारीत साखर शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले ओंकार शुगर ग्रुप शेतकरीहितासाठी कटिबद्ध असून, शेतकऱ्यांची उसाची देणी कुठेही रखडवली नाहीत. प्रत्यक्ष प्रत्येक शेतकऱ्याच्या उसास जाहीर केलेल्या दराप्रमाणे कारखान्याकडून पैसे अदा केले जात असून, आगामी काळात देखील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.

बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले, राज्यभरात गेल्या काही वर्षांपासून विश्वासार्ह नाव म्हणून ओंकार ग्रुप ओळखला जातो. साखर कारखानदारीत उसाला योग्य हमीभाव तसेच उसाचे वेळेत गाळप, यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. साखर कारखानदारीवर अवलंबून असणारे उत्पादक, शेतकरी तसेच वाहतूकदार यांचे आजपर्यंत कधीच पेमेंट रखडले गेले नाही. कामगारांची देखील गेल्या वर्षी पगारवाढ केल्याने कारखान्यातील कामगार समाधानी आहेत. काही जण प्रसिद्धीसाठी चुकीचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करतात. हा खटाटोप केवळ प्रसिद्धीसाठी सुरू असून, शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज्यभरातील जे कारखाने ओंकार ग्रुप चालवत आहेत, त्या भागातील एकाही शेतकऱ्याचे पेमेंट कुठेही राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेत असून, पुढील हंगाम व्यवस्थित कसा पार पाडता येईल, यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here