ऊसदरासाठी उद्या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम, ‘स्वाभिमानी’कडून आज कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातजनजागृती सुरु

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन उसाला पहिली उचल ४५०० रुपये विनाकपात मिळावी, या मागणीसाठी उद्या (३ नोव्हेंबर) पुणे-बगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यासह सर्व सीमाभागात सकाळी अकरापासून चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. किणी टोल नाक्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ४५०० मिळावी या मागणीसाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत बंद करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज संली जिल्ह्यात जनजागृती सुरु केली आहे.

त्यांचा सांगली जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे, सकाळी 8.30 भोसे, सकाळी 9.30 कुमठे फाटा, सकाळी 10.00 बुधगांव, सकाळी 11.00 कर्नाळ, सकाळी 11.30 नांद्रे, दुपारी 12.30 भिलवडी, दुपारी 1.00 अंकलखोप, दुपारी 2.00 दुधगांव, सायं 4.00 गोटखिंडी, सायं 5.00 तांदुळवाडी, सायं 6.00 कांदे, रात्री 7.00 कोडोली येथे जाहीर सभा होणार आहे. तरी सदर मार्गावरील गावाजवळच्या इतर गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी वरील वेळेत संबंधित आपल्या जवळच्या गावात बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

असे होईल आंदोलन…

मंगळवारी पुणे-बंगरूळ राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यावर सकाळी अकरापासून आंदोलनास सुरुवात होईल. कोगनोळीसह नागठाणे (जि. सातारा) येथेही त्या-त्या परिसरातील संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी रास्तारोको करतील. जोपर्यंत ४५०० हजार रुपये दर देण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असे शेट्टी यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here