तेलंगणा : शेतकऱ्यांनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्यपालांनी मागितली मदत

हैदराबाद : जगतीयाल जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांची भेट घेऊन बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना साकडे घातले. मल्लापूर विभागातील एकूण २४ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एक निवेदन देऊन राज्य सरकारकडे मुत्यमपेट निजाम साखर कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यास १०० दिवसांत कारखाना सुरू केला जाईल अशी घोषणा करणारे सरकार आपले आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

त्यांनी सांगितले की, कामारेड्डी येथील गायत्री साखर कारखान्याला ऊस पाठवून शेतकऱ्यांना प्रती टन ५०० रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांनी राज्यपालांना मुत्यम पेट निजाम साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली. शेतकरी लक्ष्मीपूर सोसायटीत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही करीत आहेत. हे केंद्र राज्य सरकारने अचानक बंद केले आहे. शेतकऱ्यांनी आमची दुर्दशा पाहण्यासाठी राज्यपालांनी स्वतः यावे अशी विनंती केली. राज्यपालांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले. याप्रकरणी कार्यवाही करू असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here