राज्यातील साखर उद्योगासमोर उसाच्या उत्पादकता वाढीचे आव्हान : साखर आयुक्त डॉ. संजय कोलते

पुणे : राज्यातील एकीकडे साखर कारखान्यांनी प्रतिदिन ऊस गाळप क्षमता वाढलेली असताना उसाचा पुरवठा कमी असल्याने गाळप हंगामाचे दिवस शंभरच्या आत आले आहेत. त्यासाठी उसाची उत्पादकता वाढीचे आव्हान साखर उद्योगासमोर असून सातत्याने उसाचा पुरवठा वाढण्यासाठी उसाचे नवीन वाण, ऊस बेणं बदल, पाण्याचे जलसंवर्धन, सूक्ष्म सिंचनाद्वारे गरजेइतका पाणी वापर आणि कृत्रिम बुध्दिमत्तेच्या (एआय) अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे मत राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी व्यक्त केले.

राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान (अमरावती) यांच्यावतीने उत्कृष्ठ कृषी संस्था पुरस्काराअंतर्गत राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळास (एमसीडीसी) देण्यात आला.महामंडळाचे संचालक या नात्याने व राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार साखर संकुल येथे आयोजित कार्यक्रमात स्विकारला. शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी उत्कृष्ठ रेशीम उत्पादक शेतकरी अॅड. विवेक लगड पाटील (अहिल्यानगर), उत्कृष्ठ युवा शेतकरी पुरस्कार विशाल प्रदीप पाटील (तासगाव-सांगली) यांना देण्यात आला. यावेळी एमसीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सोनाली रावल ठाकूर, माजी व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, प्रतिष्ठानच्या सदस्य श्रीमती पौर्णिमा सवाई, डॉ. दिलीप काळे, राहुल तायडे-पाटील, जयसिंगराव देशमुख, महामंडळाचे डॉ. भास्कर पाटील, हेमंत जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. कोलते म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात एमसीडीसीला उर्जितअवस्था नव्हती. आता महामंडळाने चांगल्या नियोजनाद्वारे व सांघिक कामगिरीच्या जोरावर अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रशिक्षणाद्वारे चांगला बदल घडविला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर, घरांपर्यत जाऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी हे महामंडळ काम करत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे म्हणाले, सहकार महामंडळाचे अधिकारी फक्त शासकीय वेळेत काम करत नसून शेतकऱ्यांप्रती सातत्याने काम करीत आहेत. म्हणून त्यांचा सन्मान करत आहोत. मंगेश तिटकारे यांनी प्रास्तविक तर एमसीडीसीचे प्रशिक्षण विभागाचे विभागप्रमुख दिगंबर साबळे यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here