राज्यातील ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : आमदार डॉ. अतुल भोसले यांची विधानसभेत मागणी

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आ. डॉ. अतुल भोसले यांनी राज्यातील ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने सहकारी साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना एकत्र घेऊन कृषी विभागाने राज्यात प्रायोगिक प्रकल्प राबवावा अशी मागणी त्यांनी केली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली. ऊस पिकामध्ये नवीन संशोधन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यावर बैठक घेऊन पुढील पावले उचलली जातील असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

एआय तंत्रज्ञान वापराविषयी आमदार भोसले म्हणाले की, जगभरात कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असून, यामुळे उत्पादनात मोठी वाढ होत आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणात ऊस पिकाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे एआय आधारित तंत्रज्ञानाचा प्रयोग केल्यास ऊसाचे एकरी उत्पादन वाढेल आणि त्याचा थेट फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. साखर कारखाने आणि शेतकरी यांच्या समन्वयातून या क्षेत्रात अधिकाधिक ऊस उत्पादन वाढवता येईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here