मेरठ : भारतीय किसान युनियनने (धनसिंग कोतवाल गट) पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराला आणि विस्ताराला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला आहे. देशात इथेनॉलविषयी पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचे संघटनेने खंडन केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन गुर्जर यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारत एक कृषीप्रधान देश आहे. इथेनॉल उत्पादनात वाढ झाल्याने ऊस, मका आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. गुर्जर यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचा उल्लेख करत इथेनॉल उद्योगाामुळे साखर कारखानदारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
पवन गुर्जर म्हणाले की, राज्यातील लाखो शेतकरी ऊस लागवडीवर अवलंबून आहेत. इथेनॉल उद्योगाच्या विस्तारामुळे साखर कारखान्यांची क्षमता वाढेल, ज्यामुळे उसाची मागणी वाढेल. शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या दीर्घकाळच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगाही निघू शकेल. त्यामुळे इथेनॉल वापराबाबतच्या चुकीच्या माहितीपासून लोकांनी दूर राहिले पाहिजे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. यावेळी सुनील, नितेश, जितेंद्र, अनिकेत, अभिषेक चाप्राना आणि इतर उपस्थित होते.


















