शामली : शामली साखर कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या ऊस पिकाचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन जनजागृती करत आहेत. सध्या ऊस पिकाची पाने पांढरी आणि लाल दिसू लागली आहेत, जे पांढरी माशी आणि लाल कोळी (माइट) रोगाचा प्रादुर्भाव दर्शवते. त्यामुळे पिकाला बाधित करणाऱ्या कीड आणि रोगांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर व्हावा, यासाठी शेतांना भेटी दिल्या जात आहेत, असे कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या मोहिमेत कारखान्याच्या युनिट प्रमुखांसह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. ऊस विभागाचे महाव्यवस्थापक, सतीश बलियान यांनी सांगीतले की, कारखाच्यावतीने शेतकऱ्यांना तणनाशकांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. शेतकऱ्यांना प्रति एकर ३०० लिटर पाण्यात ३०० मिली इमिडाक्लोप्रिड, ३ किलो ९० टक्के गंधक आणि ७५ मिली शॅम्पू विरघळवून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किडीमुळे उसाच्या पिकावर विपरीत परिणाम होतो. वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि उत्पादनावर परिणाम होतो. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील तण नियमितपणे काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतात किंवा आजूबाजूला वाढणारे तण नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.


















