उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

89

लखनऊ: उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखाने विभागाचे मंत्री सुरेश राणा कोरोना संक्रमित झाले आहेत. शुक्रवारी राणा यांनी स्वतः ही माहिती दिली.

सुरुवातीची लक्षणे दिसून आल्यानंतर मी कोविड १९ची चाचणी केली आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे ट्विट राणा यांनी केले आहे. स्वतः आयसोलेट झाल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्वीटमध्ये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here