यंत्राने ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास करार रद्द करू : आमदार जयंत पाटील यांचा इशारा

सांगली: यंत्राने ऊसतोड करणाऱ्यांना पैसे देऊ नका. घेणाऱ्यांबरोबर देणारेही दोषी आहेत. हा धंदा अधिकाऱ्यांनी ताबडतोब बंद करावा; अन्यथा करार रद्द करून टाकले जातील असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी दिला. राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होत. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील होते. एफआरपी आल्यावर स्पर्धा कमी झाली आणि चांगल्या रिकव्हरीला चांगला दर मिळाला. कालपरत्वे कायद्यात बदल व्हायला हवा होता. साखरेचे दर वाढले पाहिजेत, त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. देशात साखर अपुरी आहे. साखरेच्या दराबाबत सरकार गंभीर नाही, ऐन सणासुदीच्या तोंडावर देशात साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी गतवर्षीच्या तुलनेत ६.१३ टक्के उत्पन्नात वाढ झाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, व्याजाचा खर्च ७० कोटींवरून ४९ कोटींवर आणला आहे. निव्वळ नफा १ कोटी ९८ लाखांचा झाला आहे. यंदा ७४ लाख रुपयांची वीज बचत केली आहे, ती पुढीलवर्षी कोटींवर जाईल. इथेनॉल उत्पादनात १२ टक्के वाढ झाली आहे. उत्पन्न वाढले व खर्च कमी झाला आहे. आधुनिकीकरण करून कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सभासदांना सच्छिद्र पाईप व ठिबक सवलतीत देत आहे. सभेत सात एचपीपेक्षा कमी वीज वापर असलेल्या पाणीपुरवठा संस्थांना सरकारने मोफत वीज देण्याच्या मागणीचा ठरावही करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सभापती उदयसिंह पाटील, नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, प्रा. शामराव पाटील, विजयराज यादव, संग्राम फडतरे, शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. पी. आर. पाटील, रघुनाथदादा पाटील यांची भाषणे झाली. प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे यांनी नोटीस वाचन केले. डी. एम. पाटील यांनी अहवाल वाचन केले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. विजयराव पाटील यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here