‘विस्मा’च्यावतीने उत्कृष्ट पुरस्कार जाहीर, दालमिया शुगर, नॅचरल शुगर, जागृती शुगर, दौंड शुगर, श्री गुरुदत्त शुगरसह श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचा समावेश

पुणे : वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने येत्या उद्या (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विशेष उल्लेखनीय काम केलेल्या साखर कारखान्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात व गोवा येथील सुमारे १३९ खाजगी साखर कारखाने ‘विस्मा’चे सदस्य आहेत. यामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांना व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या श्रेणीनुसार या परिषदेमध्ये विशेष पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये दालमिया भारत शुगर (कोल्हापूर), जागृती शुगर (लातूर), नॅचरल शुगर (धाराशिव), श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना (दौंड, पुणे), श्री गुरुदत्त शुगर (कोल्हापूर) आणि दौंड शुगर (पुणे) यांचा समावेश आहे.

‘विस्मा’चे महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख, संचालक रोहित नारा आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, केंद्रीय साखर सहसचिव अश्विनी श्रीवास्तव व राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते हे परिषदेमध्ये सहभागी होतील. ‘विस्मा’तर्फे वरिष्ठ अधिकारी श्रेणीमध्ये सर्वश्री शहाजी गायकवाड (दौंड शुगर), संतोष कुंभार (दालमिया भारत शुगर), तुषार निघुते (वेंकटेश्वरा शुगर), वसंत शिंदे (केजीएस शुगर), बी. जी. चव्हाणके (जयवंत शुगर), शशिकांत निगुत (नॅचरल शुगर) आणि शिवाजी शिंदे (सिध्दी शुगर) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेत साखरेबरोबरच व ऊसापासून तयार होणाऱ्या सहपदार्थांची निर्मिती, ग्रीन हायड्रोजनची आवश्यकता, हवाई इंधनावरील संशोधन, शेतकचऱ्यामधून जैव इंधन निर्मिती आणि कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा साखर कारखान्यांमधील उपयोग अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here