भीमा साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन

सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ साठीच्या ४४ व्या हंगामाचे मिल रोलर पूजन खासदार धनंजय महाडिक उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या हस्ते झाले. यंदा साखर कारखान्यातर्फे ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुढील हंगामासाठी मशिनरी दुरुस्ती, तोडणी वाहतूक यंत्रणा आदी कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. आगामी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केले. कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी मंगलाताई महाडिक, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here