पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 25% किंवा त्याहून अधिक करण्यापूर्वी व्यापक चाचण्या होणार : केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

इंदूर (मध्य प्रदेश) : भारतामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे सध्याचे 20 टक्के मिश्रण वाढवून 25 टक्के (E25) किंवा त्याहून अधिक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी व्यापक चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि संपूर्ण यंत्रणा विकसित केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, गुरुवारी इंदूर येथील देवी अहिल्या विद्यापीठात संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुरी यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, भारताने 2030 हे निर्धारित उद्दिष्ट असतानाही त्यापूर्वीच पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य केले आहे. आता हे प्रमाण 25 टक्के (E25) किंवा त्यापुढे वाढवायचे की नाही, याचा निर्णय चाचण्यांचे निष्कर्ष आणि आवश्यक यंत्रणेच्या तयारीवर अवलंबून असेल.

इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना 1.40 लाख कोटींचा फायदा

ChiniMandi WhatsApp Channel

इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे समर्थन करताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, या योजनेमुळे देशाच्या परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे भारताचे एकूण 1.90 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले असून, त्यापैकी 1.40 लाख कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे.मात्र, या कार्यक्रमाबाबत काही ग्राहकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले असून टीकाही केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर पेट्रोलचे दर अवलंबून

पेट्रोलच्या वाढत्या किमतींबाबत बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, देशांतर्गत बाजारातील पेट्रोलचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात.यामध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, वाहतूक खर्च, रिफायनिंग मार्जिन आणि पेट्रोल पंप चालकांचे कमिशन यांचा समावेश होतो.जागतिक बाजारात पेट्रोलच्या पुरवठ्याची कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीनुसार पेट्रोलच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here