कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट २०२० रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यांनी महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 5 फेब्रुवारी 2024 रोजी अनेक वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केले होते. त्यामध्ये 2003 बॅचचे आयएएस अधिकारी  अनिल एम. कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here