मुजफ्फरनगर : साखर कारखान्याच्या मालकांसह अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी

बुढाना : भाकियू अराजकीयच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात पोहोचून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, बजाज साखर कारखान्याच्या मालकांसह अधिकाऱ्यांना अटक करण्यात यावे. भाकियू अराजकीयचे तालुकाध्यक्ष सुधीर पवार यांनी सांगितले की, भैसाना साखर कारखान्याच्या बडोदा गावातील ऊस खरेदी केंद्रावर वीस जानेवारी रोजी काटामारी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेबाबत साखर कारखान्याच्या मालकांसह साखर कारखान्याचे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला गेला. मात्र, त्यानंतर कोणासही अटक झालेली नाही. याबाबत निवेदन देवून ज्यांची नावे आहेत, त्या सर्वांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. जर दोन दिवसांत अटकेची कारवाई झाली नाही, तर आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. इन्पेक्टर ब्रजेश कुमार शर्मा यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले जाईल असे सांगितले. यावेळी सुधीर पवार, यासीन, के. पी. सिंह, गजेंद्र, हरिराज, शीशपाल व योगेंद्र आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here