थकीत ऊस बिलावरील व्याज देण्याची निवेदनातून मागणी

88

हापूड : साखर कारखान्यांकडून थकीत असलेल्या ऊस बिलावर व्याज देण्याची मागणी राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत नव्या मंडईतील ऊस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष वीरेश चौधरी यांनी सांगितले की हापूड ऊस समितीच्या परिसरात ऊसाची बिले उशीरा मिळाल्याने जी व्याज आकारणी करणे गरजेचे आहे, ते व्याज मिळावे यासाठी संघटनेच्यावतीने जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी मदत होईल यासाठी त्वरीत कार्यवाहीची मागणी केली आहे. आगामी काही दिवसांत साखर कारखाने पु्न्हा सुरू होतील. त्यामुळे सरकारने ऊस दर लवकर निश्चित केला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

निवेदन देणाऱ्यांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष वीरपाल सिंह, मंडल प्रभारी तरुण चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष विनीत त्यागी, ज्ञानी बलविंदर सिंह, अमित, दुष्यंत, बादल, अतुल आदींसह शेतकरी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here