जळगाव : खानदेशी शेतकऱ्यांकडून केळीपाठोपाठ भाजीपाला, ऊस लागवडीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. पाऊसमान चांगले झाल्यामुळे कांदा, कलिंगड, केळीची लागवड अपेक्षेपेक्षा अधिक झाली. अन्य पिकांत फारसा पैसा नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी केळीपाठोपाठ भाजीपाला पिके, उसाची लागवड केल्याचे ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे
नंदुरबारमध्ये 16 हजार हेक्टर, जळगावात सुमारे 14 हजार हेक्टरवर आणि धुळ्यास सुमारे सात हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. ऊस लागवड मात्र स्थिर आहे. शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड केली आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. एक हजार ५० रुपयांना मिळणारी बॅग आता एक हजार ७०० ते एक हजार ८०० रुपयांवर जाऊन पोचलेली आहे. त्यातच डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चदेखील दीडपटीने वाढला आहे. लहरी हवामानाचा धसका लहरी हवामान, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक घटक शेतकरी बांधवांच्या अडचणीत वाढ करीत असतात. ही संकटे असतानाही शेतकरी उसासह फळ व भाजीपाला पिकांना पसंती देत आहेत.


















