कर्नाटक : कोगनोळीत शॉर्ट सर्किटमुळे आग; शेतकऱ्यांचा २५ एकरांवरील ऊस खाक

बेळगाव : हणबरवाडी रोडवरील चौगुले मळ्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत २५ एकरांवरील ऊस पिक जळाले. सोमवारी (ता. २६) दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत परिसरातील दहाहून अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचा प्रयत्न केला, मात्र आगीचा तडाखा आणि उग्र स्वरूपामुळे आग नियंत्रणात आणणे अशक्य झाले. या दुर्घटनेत २५ एकरमधील तयार झालेला ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चौगुले मळा परिसरात दिलीप पाटील, संतोष पाटील, राजू चौगुले, नितीन चौगुले, हार्दिक पाटील, अनिल पाटील, शेखर चौगुले, अभिनंदन चौगुले, उदय पाटील आणि महादेव जगदाळे यांची शेतजमीन आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास परिसरातील विद्युत तारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. ठिणगीतून लागलेल्या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले. ही आग लवकर आटोक्यात आली नाही. त्यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसाान झाले. प्रशासनाने तातडीने येऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here