कर्नाटक : जमखंडी शुगरच्यावतीने विजयपुरा युनिटच्या विस्ताराची योजना तयार

विजयपुरा : जमखंडी शुगर्सने कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील नाद केडी गावात आपली साखर कारखान्याची क्षमता ३,५०० टीसीसीपीडीपासून वाढवून १०,००० टीसीसीपीडी करण्याची योजना तयार केली आहे, असे वृत्त प्रोजेक्ट्स टुडेने दिले आहे. कारखान्याच्या या योजनेमध्ये २७.५ मेगावॅटपासून ३४.५ मेगावॅटपर्यंत सहवीज उत्पादन प्लांटचाही समावेश असेल. आणि चार मेगावॅटचा कचऱ्यावर आधारित कॅप्टीव्ह पॉवर प्लांटसोबतच ३०० केएलपीडी क्षमतेच्या एका नव्या डिस्टिलरी युनिटची स्थापनाही केली जाईल.

जमखंडी शुगर्सच्या प्रशासनाला या योजनेच्या पर्यावरण मंजुरी आणि आर्थिक वर्षअखेरीची प्रतीक्षा आहे. ठेकेदार आणि मशीनरी पुरवठादारांच्या नियुक्तीसही अंतिम रुप देण्यास सुरुवात केली आहे. FY24 च्या पहिल्या तिमाहीत या प्रकल्पावर काम सुरू होईल अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here