कोल्हापूर : मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा, करवीर तालुक्यात हजारो एकरांवरील ऊस जमीनदोस्त

कोल्हापूर: यंदा पावसाच्या उशिरामुळे आधीच शेतीची कामे विस्कळीत झाली होती. त्यात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने संपूर्ण चित्रच बदलून टाकले आहे. करवीर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये उसाचे पीक पूर्णपणे आडवे पडल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. जमिनीवर आडवा झालेला ऊस उभा करणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाळ्यातील आठवड्याभरात उसाची ही अवस्था तर पुढे उसाचे काय होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतीचे नियोजन कोलमडत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू – असलेल्या मुसळधार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने करवीर – तालुक्यातील अनेक गावांतील उसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. हजारो एकरांवरील ऊस अक्षरशः भुईसपाट झाला असून शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे. सद्यस्थितीत पाण्याचा निचरा न झाल्यास उसाचे कुजणे, रोगराई वाढणे आणि साखरेचा उतारा कमी होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here