कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सरदार आनंदराव पाटील (पाडळी खुर्द) यांची बिनविरोध निवड झाली. राहुल खाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी साखर सहसंचालक गोपाळ माळवे होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमख उपस्थिती होती.
सरदार पाटील यांचे नाव संचालक पी. डी. पाटील यांनी सुचवले, तर संजय पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले. यावेळी अॅड. बाजीराव शेलार, अनिष पाटील, विलास पाटील, राहुल खाडे, विश्वास पाटील, दादासाहेब लाड, रवींद्र मडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश पाटील, उत्तम वरुटे, डॉ. प्रा. बी. बी. पाटील, किशोर पाटील, अनिल पाटील, बळवंत करचे, वसंत आळवेकर, राऊ पाटील, सर्जेराव हुजरे, धनश्री पाटील, प्रमिला पाटील, कृष्णात कांबळे, युवराज शिंदे, प्रशांत पाटील उपस्थित होते. कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी आभार मानले.


















