सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी तानाजीराव नारायण शिंदे (चिखली) यांची बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर उपविभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) गोपाळ मावळे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत निवड झाली. दिलीपराव सूर्यवंशी (वांगी) यांच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त होते. भीमराव मोहिते यांनी सूचना केली. प्रभाकर जाधव यांनी अनुमोदन दिले.
नूतन उपाध्यक्ष तानाजीराव शिंदे म्हणाले, “आमदार विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामकाज करू.” मावळते उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी यांचा माजी आमदार कदम यांच्या हस्ते सत्कार झाला. संचालक रघुनाथराव कदम, शांताराम कदम, बापूसो पाटील, युवराज कदम, पोपटराव महिंद, पंढरीनाथ घाडगे, पुरुषोत्तम भोसले, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, शारदा कदम, सुनीता जगताप, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम उपस्थित होते.


















