सांगली: साखर उद्योगातील शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हीएसआय या संस्थेकडून ऊस शेतीचे अद्यावत ज्ञान व प्रशिक्षण घेण्यास येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतशील महिला शेतकरी रवाना झाल्या. या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी शितल उमाकांत पाटील, राजश्री माने, माया कदम, सरिता पाटील, सारिका पिसाळ, गिता महाजन, राजश्री पाटील, अनिता पाटील, तेजस्विनी देशमुख, संगिता आंबी, अंजना पवार, ज्योती आंबी आदींचा समावेश आहे.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ऊसविकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, संचालक राजकुमार कांबळे यांनी महिला शेतकऱ्यांना निरोप दिला. यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे, सचिव डी. एम. पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, कामगार युनियनचे कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे, वाहन विभाग प्रमुख सुनिल जाधव, ऊस पुरवठा अधिकारी संग्राम पाटील उपस्थित होते. ऊस विकास विभागाचे विवेक पुजारी, अविनाश खोत, प्रकाश मगदूम, संग्राम कांबळे, आशिष पवार, सुहास पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


















