सोलापूर : दामाजी कारखान्याचे सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट, ऊसतोडणी वाहतूक करार सुरू

सोलापूर : श्री संत दामाजी साखर कारखान्याने चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन तानाजी खरात व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मागील चार हंगाम यशस्वी पूर्ण झाले आहेत. येत्या हंगामासाठी मंगळवेढा तालुक्यातील सुमारे ८,५०० हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक उभे असून, त्याची नोंद कारखान्याकडे झाली आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये ५ ते ६ लाख मे.टन गळिताचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम करण्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या करार प्रक्रियेचा प्रारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. कारखान्याने तोडणी-वाहतूक व्यवस्थेसाठी सुमारे २०० ट्रक/ट्रॅक्टर, १७५ डंपर, २५० बैलगाड्या आणि ६ आधुनिक तोडणी यंत्रांचे करार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मशिनरीची दुरुस्ती व ओव्हरहॉलिंगची कामेही वेळेत पूर्ण केली जात आहे. त्यासाठी लवकरच अॅडव्हान्स वाटप करून यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. कार्यक्रमास चीफ अकाउंटंट रमेश गणेशकर, उपशेती अधिकारी पंडित गायकवाड, परचेस ऑफिसर संदीप इंगोले, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, ओव्हरसिअर जगन्नाथ इंगळे यांच्यासह अधिकारी, तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here