सोलापूर : पंढरपूर तालुक्यात पुन्हा ऊस लागवडीची लगबग, शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांना दिलासा

सोलापूर : यंदा राज्य सरकारसह विविध हवामान तज्ज्ञांनी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी पावसाचे सोलापूर कमी राहील असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती राहील, अशी शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिली असली तरी जिल्ह्याचे वरदायनी असलेले उजनी धरण व पंढरपूर तालुक्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणारे वीर धरण मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना सध्याच्या पाणीसाठ्यामुळे दिलासा मिळत असून धरणे निश्चित भरतील या आशेवर नदीकाठच्या परिसरात पुन्हा ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. ऊस लागवडी होतील व कारखाने पुन्हा पूर्ण क्षमतेने चालतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पावसाचा हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी पंढरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. फक्त भीमा व नीरा खोऱ्यात मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूरसाठी वरदान ठरणारे नीरा खोऱ्यातील वीर व भीमा खोऱ्यातील उजनी धरण भरू लागले आहे. दोन्ही धरणात आठवडाभरात वाढलेला पाणीसाठा पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. वीर धरण १०० टक्के भरल्यानंतर वीरमधून सोडण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग भीमा नदीत मिसळेल. नीरा कालव्यातूनही पाणी सुरू असल्यामुळे नदीकाठचा परिसर व कालव्याच्या परिसरातील जळणाऱ्या केळी, डाळिंब, ऊस, द्राक्ष, भाजीपाला व वैरणीच्या पिकांना या पाण्यामुळे जीवदान मिळणार आहे. निरा व भीमा खोऱ्यात झालेला दमदार पाऊस व धरणे भरण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे उजनीचा डावा व उजवा कालवा, नीरा कालवा व नदीकाठच्या परिसरात नव्याने ऊस लागवडी सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षातही उसाचे क्षेत्र पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here